Kisaanyard: A Beacon of Innovation and Efficiency in Agricultural Trading
पिकातील रोगाची ओळख कशी करावी ?
पानांवरील डाग:
पानांवरील तपकिरी, पांढरे किंवा पिवळे डाग दिसल्यास, हे बुरशीजन्य संक्रमणाचे लक्षण असू शकते.
यामध्ये भुरी रोग(powdery mildew ), मर रोग (black rot), यांसारखे रोग समाविष्ट असू शकतात.
मुळांवरील सूज :
पिकांच्या मुळांवर सूज, कुजलेले भाग किंवा नरमपणा दिसल्यास, हे मूळकुज किंवा फ्यूझेरियम विल्ट
सारख्या रोगाचे लक्षण असू शकते.
फुले गळणे :
फुलं गळत असतील आणि झाडे पिवळट किंवा कमजोर दिसत असतील, तर हे बुरशीजन्य रोगांचे
संक्रमण होऊ शकते.
कीड व कीटकांचा प्रादुर्भाव :
पानांवरील छिद्र, पिवळी पडलेली पानं, फुलांची खराबी आणि फळांचा नाश हे त्याचे मुख्य लक्षणे आहेत.
तज्ञ मार्गदर्शन :
आपल्याला कोणत्याही प्रकारची पिक अडचण असल्यास, कृपया किसान यार्ड कृषितज्ञ किंवा स्थानिक कृषि
विज्ञान
केंद्राशी संपर्क साधा. ते आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देतील, जो आपल्या शेतांसाठी आणि
पिकांसाठी
उपयुक्त असेल. तज्ञांचा सल्ला घेऊन आपण रोग, कीटक आणि खतांच्या योग्य वापराबाबत अधिक माहिती मिळवू
शकता.
खते वापरण्याचे मार्गदर्शन:
माती परीक्षण :
खते वापरण्यापूर्वी मातीची चाचणी करून पोषक घटकांची कमतरता जाणून घ्या, यामुळे योग्य खतांचा वापर होईल.
वेळेनुसार खतांचा वापर
बीज पेरणी, झाडांची वाढ आणि पिकांच्याच्या फळधारणेदरम्यान वेगवेगळ्या प्रमाणात खतांची गरज पूर्ण करावी.
संतुलित खते :
नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि सूक्ष्म पोषक खतांचा योग्य प्रमाणात व वेळेत वापर करावा.
सिंचनासोबत मिश्रण:
खते सिंचनासोबत मिसळून वापरल्यास पिकांना पोषण तत्त्वे चांगल्या प्रकारे मिळते.
हंगाम आणि अवस्था:
पिकांच्या वाढीच्या टप्प्यावर व फळधारणेदरम्यान खतांची आवश्यकता अधिक असते. हंगामानुसार वेळेवर खते
दयावी.
सेंद्रिय खते :
सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करावा यामुळे मातीची सुपीकता टिकवतो आणि पर्यावरणाला हानी ही
पोहोचवत नाही.
निर्देशांचे पालन:
रासायनिक खते वापरताना त्यावरील निर्देशांचे पालन करा.